शेती आणि शेतीशी निगडित उत्पादन निर्मितीचा ध्यास घेत म्हसवडे यांनी 10 जून 1996 मध्ये बारामती एमआयडीसीत श्री योगीराज इंडस्ट्रिजची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी कुटुंबातील म्हसवडे यांनी बीई मेकॅनिकलचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची वाट धरली नाही. त्यांना शेतकऱ्यांप्रती प्रचंड आस्था होती. कामाप्रती अढळ निष्ठा, शेतीत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दर्जेदार आणि विश्वसनीय उत्पादन देण्यासाठी त्यांनी योगीराज इंडस्ट्रिजच्या स्थापनेपासून दक्षता घेतली. कामांवरील निष्ठा, अढळ विश्वास कधीही ढळू दिला नाही. त्यामुळे गेल्या 24 वर्षांत त्यांची ट्रॅक्टरचे डोझर, लोडर, ट्रॅक्टर जीसीबी आदी उत्पादने महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहेत. आता योगीराजची नावीन्यपूर्ण उत्पादने निर्यात होऊ लागली आहे. शेती, बांधकाम व्यवसायातील उत्पादनाची हमी असल्याने शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनाला मागणी वाढत आहे. बारामती, पंढरपूरला शाखा आहेत. महाराष्ट्र सावता परिषदेकडून पुरस्कार मिळाला आहे. बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रिज, पिंपरी- चिंचवड लघू उद्योजक परिषदेकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. किफायतशीर दर, उत्तम ग्राहकसेवा, दर्जेदार उत्पादन यावर बाजारपेठ काबीज केली आहे.
श्री योगीराजची चार उत्पादने पसंतीला उतरली
योगीराज इंडस्ट्रिजमध्ये शेती हाच केंद्रबिंदू ठेवून उत्पादनाची निर्मिती झाली आहे. सध्या ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. विश्वसनीयता,
दर्जेदार साहित्य, विक्री पश्चात सेवा, ग्राहकांशी आपुलकीचे नाते यावर त्यांनी महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. सध्या योगीराज इंडस्ट्रिजची चार उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. यात शुगरकेन हार्वेस्टर इनफिल्डर, ट्रॅक्टर हायड्रोलिक नांगर, इलेक्ट्रिकल स्ट्रेट लाईट रिपेअरिंग लॅडर (शिडी), शुगर कॅन रॅडीअल रोडल ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत.
शुगरकेन हार्वेस्टर इनफिल्डर
महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस क्षेत्र आहे. सध्या ऊस तोडणी यंत्रणेत कामगारांची उणीव आता अत्याधुनिक यांत्रिकीकरणामुळे भरून निघत आहे. ही दूरदृष्टी योगीराजच्या यशात माईल स्टोन ठरला आहे. शुगर केन हार्वेस्टर इनफिल्डरमुळे ट्रेलर भरले जातात. तसेच ट्रकसाठी स्पेशालिटी निर्मिती केली आहे. जादा उंचीच्या ट्रकमध्ये ऊस वाहतूक करण्यासाठी हे यंत्र सोयीस्कर आहे. त्यामुळे या उत्पादनाला मागणी वाढत आहे. शेतकरी बांधव या उत्पादनाबाबत अतिशय समाधानी असल्याचे अनेकदा बोलून दाखवतात, हे विशेष.
ट्रॅक्टर हायड्रोलिक नांगर आणि पोस्ट होल डिगर
शेतीत मशागत करण्यासाठी हायड्रोलिक पद्धतीचा वापर केला जात आहे. याचा अभ्यास करून उद्योजक अरूण म्हसवडे यांनी ट्रॅक्टर हायड्रोलिक नांगरचे उत्पादन बारामतीच्या योगीराज इंडस्ट्रिजमध्ये सुरू केले आहे. शेतकरी आणि वाहतूकदारांकडून ट्रॅक्टर हायड्रोलिक नांगरला मागणी आहे. या नांगराची वैशिष्ट्ये लक्षवेधी ठरली आहेत. हे नांगर वापरण्यास सोपा, स्पेशल डिझाइन, नांगरटीची खोली ही दीड फुटांपर्यंत आहे. यासाठी मजबूत आणि दर्जेदार स्टील वापरले आहे. अल्पभूधारक आणि मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांना हे नांगर किफायतशीर ठरले आहे.
इलेक्ट्रिकल स्ट्रेट लाईट रिपेअरिंग लॅडर (शिडी)
गावासह शहरातही नागरिक आणि प्रशासनावर वाढता ताण पडत आहे. तसेच कृषी क्षेत्रात फळबागांची लागवड आता शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. रस्त्यावरील दिवा बसविणे, दुरुस्तीची कामे इलेक्ट्रिल स्ट्रेट लाईट रिपेअरिंग लॅडरमुळे (शिडी)शक्य झाले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून लॅडल बहुउपयोगी ठरले आहे. गावातील खोळंबलेली कामे झटपट होत आहेत. फळबागांमध्ये शेतकरी या साधनाचा पुरेपूर वापर करीत आहेत. बाजारपेठेत लवकर आणि
दर्जेदार फळ विक्रीसाठी या लॅडरचा वापर केला जात आहे. या लॅडरला मागणी वाढली आहे.
शुगर कॅन रॅडिअल लोडर
ऊस तोडणी यंत्रणेत शुगर कॅन रॅडिअल लोडर महत्त्वपूर्ण ठरले आहे. ऊस तोडणीनंतर डायरेक्ट डोझरने ऊस गोळा केला जातो. तीन ते चार मोळी एकत्रित केले जातात. रॅडीअल ग्रॅबर लोडरने उचलून ट्रेलरमध्ये थेट 20 फुटांपर्यंत भरले जाते. यामध्ये ट्रक, ट्रेलरचा समावेश आहे. या कामात सहा मजुरांची बचत होत असल्याने शेतकरी आणि वाहतूकदारांकडून मागणी वाढली आहे. या लोडरचे वैशिष्टे म्हणजे 180 डिग्रीला अर्धगोलाकार फिरू शकते. मोळ्या बांधावे लागत नाही. थेट मोळ्या उचलल्यामुळे सध्या यांत्रिकीकरणाला अनुरूप निर्मिती योगीराज इंडस्ट्रिजमध्ये निर्मिती केली जात आहे.
नेपाळला निर्यात
योगीराज इंडस्ट्रिजकडून दर्जेदार उत्पादन निर्मिती होत आहे. त्यामुळे शेतकरी, वाहतूकदार यांच्याकडून उत्पादनाला मागणी आहे. नेपाळमध्ये ऊस तोडणीसाठी योगीराजची उत्पादने विश्वासाला पात्र ठरली आहेत. नेपाळ देशात योगीराजची उत्पादने निर्यात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण उत्पादन निर्मिती करणारे उद्योजक अरुण म्हसवडे यांच्या दूरदृष्टीला ग्राहकांनी पोचपावती दिली आहे.
श्री योगीराज इंडस्ट्रिज
ऑफिस/ वर्क्स (युनिट- 2)
इ- 11 एमआयडीसी बारामती,
जि. पुणे-413133
फोन – 9822297072 9822192163 9623453228