मुंबई : कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. नात्यांचा गुंता अधिकच वाढला. आता एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही म्हणजेच अंतरा आणि मल्हारची कसोटी लागतं आहे. अंतराने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले.
View this post on Instagram
आता मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे ज्यामध्ये चित्राकाकीने अंतराला अडकवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कारण मालिकेमध्ये मोठी घटना घडली. चित्राकाकी आणि काकाला घरामधुन बाहेर काढले आणि यासगळ्यामागे अंतराचाच हात आहे असा चित्राकाकीचा समज झाला.
View this post on Instagram
आता अंतरालादेखील घराबाहेर कसे काढता येईल ? तिच्यासोबत सगळ्या खानविलकरांना जेलमध्ये कसे सडवायचे आणि सगळ्याचा ताबा कसा मिळवायचा याचा कट चित्राकाकी आणि काका रचताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
चित्राकाकी अंतराला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन करताना दिसणार आहे. दुसरीकडे, मल्हारला काका आणि काकीच्या प्लॅनबद्दल कोणीतरी माहिती देताना दिसणार आहेत. आता या सगळ्यामधून अंतरा कशी वाचणार ? मल्हारची साथ अंतराला मिळणार का ? अंतरावर मल्हार विश्वास ठेवणार का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.