हल्लेखोरांचा शोध सुरू; गुन्ह्याचे कारण अस्पष्ट
कराड – आगाशिवनगर येथील दांगट वस्तीतील विकास उर्फ विकी रघुनाथ लाखे याचा बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
विकास उर्फ विकी लाखे याच्यावर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून खून केला होता. हल्लेखोरांनी धारदार कोयत्याचाही वापर केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या व कोयता ताब्यात घेतला.
या प्रकरणी अन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले नसून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. हा खून क्लबच्या वादातून, टोळीयुद्धातून झाला की, त्यामागे अन्य कारणे आहेत, याचा उलगडा झालेला नाही. यासंदर्भात कराड तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसात विकी लाखेच्या हल्लेखोरांना ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तीन महिन्यात दुसरा खून झाल्याने मलकापूर व कराड शहरात खळबळ उडाली आहे.