दीर्घ कालावधीच्या चाचणीनंतर, मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपने अखेर त्यांचे कम्युनिटी फिचर जारी केले आहे. व्हॉट्सअॅप कम्युनिटीज फिचर जागतिक स्तरावर जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. व्हॉट्सअॅप कम्युनिटी फीचरची चाचणी खूप दिवसांपासून सुरू होती. कम्युनिटी फीचर व्यतिरिक्त अनेक नवीन फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत.
व्हॉट्सअॅप कम्युनिटीज फीचरद्वारे मतदान केले जाऊ शकते आणि वन टॅप व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध असेल. याशिवाय व्हिडिओ कॉलिंगमध्ये 32 लोक एकाच वेळी ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतील. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कम्युनिटी फीचरची घोषणा केली आहे.
व्हॉट्सअॅप कम्युनिटीजचा सर्वात मोठा फायदा हा असेल की तुम्ही सर्व ग्रुप्स एका कम्युनिटीमध्ये ठेवू शकाल. सर्व ग्रुपचे अपडेट त्याच कम्युनिटीमध्ये उपलब्ध असतील. कम्युनिटी फिचर अंतर्गत, ऍडमिन कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यास सक्षम असेल. कम्युनिटी फिचरद्वारे कार्यालये, शाळा, क्लब आणि इतर संस्था कनेक्ट करण्याचा हेतू आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना चॅटच्या शीर्षस्थानी कम्युनिटी फिचर दिसेल, तर आयओएस वापरकर्त्यांना ते तळाशी दिसेल.
व्हॉट्सअॅपमध्ये ग्रुप पोल फीचर देखील आले आहे ज्याचा वापर मतदानासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय, आता एका ग्रुपमध्ये 1,024 लोकांना जोडले जाऊ शकते, जी आधी 512 इतकी होती. टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये 2,00,000 लोक सामील होऊ शकतात.