UAE’s Golden Visa: परदेशात जाण्यासाठी व्हिसा हे एक महत्त्वाचे डाॅक्यूमेंट आहे. ज्याप्रमाणे पासपोर्टशिवाय परदेशात जाता येत नाही. त्याचप्रमाणे व्हिसाशिवाय परदेशात जाता येत नाही. व्हिसाचे अनेक प्रकार आहेत. या व्हिसांपैकी एस गोल्डन व्हिसा आहे.
सुपर-30 चे संस्थापक आनंद कुमार यांना गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. गोल्डन व्हिसा हा एक खास व्हिसा आहे. भारतात फार कमी लोकांकडे हा व्हिसा आहे. हा व्हिसा यूएई सरकारने जारी केला आहे. या यादीत किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि संजय दत्त यांसारख्या अनेक भारतीयांचा समावेश आहे.
गोल्डन व्हिसा म्हणजे काय?
गोल्डन व्हिसा अरब अमिराती सरकारद्वारे जारी केला जातो. हा एक खास व्हिसा आहे. यामध्ये, यूएई सरकारकडून मर्यादित संख्येने लोकांना ते दिले जाते. 2019 मध्ये यूएई सरकारने हा व्हिसा सुरू केला होता.
हा व्हिसा 5 ते 10 वर्षांसाठी दिला जातो. यामध्ये व्हिसाधारकाला विशेषाधिकार दिले जातात. हा व्हिसा प्रामुख्याने डॉक्टर, शास्त्रज्ञ, संस्कृती आणि कलाकार, खेळाडू, डॉक्टरेट पदवीधारकांना दिला जातो. या व्हिसामध्ये व्हिसाधारकाला दीर्घकालीन वास्तव्यास परवानगी दिली जाते. याशिवाय, या गोल्डन व्हिसामध्ये, व्हिसाधारकाला यूएईमध्ये काम करण्याची किंवा अभ्यास करण्याची देखील परवानगी आहे.
भारतात यांच्याकडे आहे गोल्डन व्हिसा –
शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, क्रिती सॅनन, बोनी कपूर, रणवीर सिंग, कमला हसन, आनंद कुमार, सुनील शेट्टी, मोहन लाल, पृथ्वीराज सुकुमारन, सोनू निगम, वरुण धवन, फरहा खान, जॉनी लीव्हर, सोनू सूद, संजय कपूर, जॉन अब्राहम, तुषार कपूर, अंशुला कपूर, आर पार्थिवन, तृष्णा कृष्णन, के एस चित्रा, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, भूषण कुमार, दिव्या कुमार, जावेद अख्तर, शबाना आझमी, अमला पॉल, मौनी रॉय.