West Indies Cricket : शामार जोसेफ ठरु शकतो कसोटी क्रिकेटचा तारणहार, ‘स्टीव्ह-वॉ’ ने केले कौतुक…

ब्रिस्बेन – सांघिक कामगिरी अगदीच खालावलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेटला जनवसंजीवनी देणारी घटना म्हणजे वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात कसोटी सामन्यात पराभूत केले. पाहुण्यांच्या या कामगिरीचा शिल्पकार ठरलेला गोलंदाज शामार जोसेफ हा कसोटी क्रिकेटचा तारणहार ठरु शकतो, अशा शब्दांत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ याने त्याचे कौतुक केले आहे. वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात २७ वर्षांतील पहिला कसोटी विजय मिळवून देतानाची शामारची कामगिरी लक्षवेधी असल्याचे स्टीव्ह वॉने सांगितले आहे.
दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या २४ वर्षीय जोसेफने ११.५ षटकांत ६८ धावा देत यजमान संघाच्या सात विकेट्स घेतल्या आणि स्वत:च्या संघाला ब्रिस्बेन-गाब्बा येथे आठ धावांनी रोमांचकारी विजय मिळवून दिला. हे मैदान म्हणजे यजमानांचा पारंपारिक किल्ला समजला जातो.
वेस्ट इंडीजच्या संघात संधी मिळण्यापूर्वी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एका सिक्युरिटी गार्डचे काम करणारा शामार जोसेफ आज जगभर कौतुकाचा विषय ठरला आहे. शिवाय त्याला अनेकदा दुखापतींनाही सामोरे जावे लागले होते.
IND vs ENG 1st Test : जसप्रीत बुमराहला ‘ती’ चूक भोवली, आयसीसीने सुनावली ‘ही’ शिक्षा…
कसोटी क्रिकेट हे या खेळाचे शुद्ध आणि पवित्र रुपपासून शामार जोसेफ अशा खेळाचा तारणहार असू शकतो, असे स्टीव्ह वॉने जोसेफचा फोटो शेअर करताना इंस्टाग्रामवर लिहिले आहे. सिंड्रेलाच्या कथा खेळात दुर्मिळ आहेत. परंतु हे खरोखरच एका तरुण व्यक्तीचे महाकाव्य आहे ज्याने कॅरिबियन आणि संपूर्ण जगभरातील क्रिकेट अनुयायांच्या उत्कटतेला एक नवे परिमाण दिले आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक इयान बिशपने हा विजय ‘आतापर्यंतचा सर्वात उल्लेखनीय कसोटी विजय’ असल्याचे म्हटले आहे. शामार जोसेफ आणि वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी हा खूपच किती उल्लेखनीय क्षण आहे, असेही बिशप म्हणाला.





