Saurashtra Cricket Association, CK Nayudu Trophy : भारतीय क्रिकेटशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. चंदीगड विमानतळावर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाकडून 27 दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बाॅक्स जप्त करण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाच्या 5 क्रिकेटर्सच्या किटमध्ये दारूच्या बाटल्या आणि बिअरचे बाॅक्स सापडले आहेत. ज्या क्रिकेटपटूंकडून दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडले ते सीके नायडू ट्रॉफीमधील सौराष्ट्रच्या 23 वर्षांखालील संघातील आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण…
25 जानेवारीला सौराष्ट्र संघाने सीके नायडू ट्रॉफीमध्ये यजमान चंदीगडचा पराभव केला. यानंतर सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली, मात्र त्यानंतर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. सौराष्ट्रातील 5 क्रिकेटपटूंकडे 27 दारूच्या बाटल्या आणि 2 बिअरच्या बाॅक्स सापडल्या आहेत. मात्र, वृत्त लिहेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र या घटनेने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
#WATCH | Rajkot, Gujarat: On liquor bottles allegedly recovered from Saurashtra cricketers at Chandigarh Airport, Secretary of Saurashtra Cricket Association Himanshu Shah says, “…This alleged incident is unfortunate and intolerable. Ethics and disciplinary committee and the… pic.twitter.com/WxyePGWvOF
— ANI (@ANI) January 29, 2024
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काय म्हणाले?
यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की चंदीगडमध्ये एक कथित घटना घडली आहे जी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निदर्शनास आली आहे. कथित घटना दुर्दैवी आणि असह्य आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची नैतिकता/शिस्तपालन समिती आणि सर्वोच्च परिषद या घटनेची सखोल चौकशी करेल आणि योग्य शिस्तभंगाची कारवाई करेल.