ICC Punished Jasprit Bumrah Breaching Code of Conduct : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज आणि कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. हैदराबाद कसोटीत झालेल्या एका प्रकरणात बुमराहला आयसीसीने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात बुमराह आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 मध्ये दोषी आढळला आहे. आयसीसीच्या घटनेच्या कलम 2.12 अन्वये तो दोषी ठरला होता. मैदानी पंचांनी सामनाधिकारींकडे केलेल्या तक्रारीवरून आयसीसीने हा निर्णय दिला आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियासाठी हा दुहेरी धक्का आहे.
बुमराह दोषी का ठरला?
आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. बुमराहला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.12 अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अंतर्गत, जर एखाद्या खेळाडूने इतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अंपायर किंवा मॅच रेफरी यांच्यासह कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य शारीरिक संपर्क (Physical Contact) केला तर तो दोषी ठरता. भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहला ओली पोप रन घेताना त्याच्या मार्गात आल्याबद्दल ही शिक्षा झाली.
The Code of Conduct breach occurred during the fourth day of #INDvENG first Test in Hyderabad 👀
Details 👇https://t.co/PPjnAhcBAY
— ICC (@ICC) January 29, 2024
काय होतं संपूर्ण प्रकरण?
हैदराबाद कसोटीत इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ही संपूर्ण घटना पाहायला मिळाली. इंग्लंडच्या डावातील 81 वे षटक सुरू होते आणि त्यावेळी ऑली पोप क्रीजवर होता. रन घेताना बुमराह ऑली पोपच्या मध्ये आला आणि दोघेही एकमेकांवर आदळले. या संघर्षाला अयोग्य शारीरिक संपर्क (Physical Contact) म्हणून संबोधले गेले.
बुमराहला झाली ही शिक्षा…
आता जर आपण शिक्षेबद्दल बोललो तर अशा प्रकरणांमध्ये खेळाडूंना अनेकदा मॅच फीच्या 50 टक्के दंड आकारला जातो आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट मिळतात. मात्र, बुमराहला आयसीसीने फटकारले आणि सोडून दिले. त्याला दंडही ठोठावला नाही. कारण, गेल्या 24 महिन्यांत बुमराह पहिल्यांदाच दोषी आढळल्याने त्याला केवळ एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. तसेच सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांच्यासमोर बुमराहने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणीची गरज भासणार नाही.