पोचेस्ट्रूम – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या हॉकी सामन्यात शानदार हॅटट्रिक नोंदवून प्रकाशझोतात आलेला भारताचा युवा ड्रॅग फ्लिकर जुगराज सिंग याने हा दौरा आपल्याासाठी खूप महत्वाचा ठरला असे सांगितले. जुगराज सिंगयाने फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
एफआयएच प्रो लीगसारख्या स्पर्धेतून माझे पदार्पण झाले हे मी माझे भाग्य मानतो. दुसऱ्याच सामन्यात माझ्याकडून हॅटट्रिकची नोंद झाली ही माझ्यासाठी सर्वात विशेष गोष्ट असल्याचे जुगराजने सांगितले.
पदार्पणासाठी इतकी मोठी स्पर्धा मिळाली आणि त्या स्पर्धेत भारताच्या विजयासाठी काही तरी करू शकलो हे महत्वाचे. केवळ आनंदच नाही, तर दौऱ्यातील या चार सामन्यांने मला खूप काही शिकवले, असेही जुगराज म्हणाला.
या दौऱ्यात भारताला चार सामन्यापैकी फ्रान्सविरुद्धच्या एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यात भारताने त्यांना 2-10 अश्या फरकाने नमविले. तर फ्रान्सविरुद्ध 5-0 असा विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याना 2-5 असा पराभव पत्करावा लागला.
भारतीय संघापर्यंत पोचेपर्यंत जुगराजला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्याचे वडील अतारीच्या सीमेवर कुली म्हणून काम करायचे. पाच भावांमध्ये जुगराज एकट्याने कारकिर्द घडवण्यासाठी खेळाची निवड केली. वयाच्या 11 व्या वर्षी तो क्रीडा हॉस्टेलमध्ये आला आणि त्याच्या कारकिर्दीला वळण मिळाले. त्यानंतर भारतीय नौदलात त्याची सेवा सुरू झाली. तेव्हा त्याच्या हॉकीपटूला सुरवात झाली.