मुंबई – अभिनेत्री मृण्मयी देशपांडेला कोण ओळखत नाही. आपल्या अभिनयाच्या जोरावर मृण्मयीने एकापेक्षा एक असे दर्जेदार चित्रपट आजपर्यंत दिले आहेत. सध्या ती आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांना विविध अपडेट देत असते. नुकतंच मृण्मयीने आपल्या इंस्टाग्रामवर एक घराचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
मृण्मयीने Dream in progress ! या कॅप्शनखाली एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती म्हणते,जगायला काय लागतं ? १०×२० ची आनंदी जागा आणि ज्याच्या बरोबर स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याचा हात… २ वर्षांपासून झगडतो आहोत पण आता मिटल्या डोळ्यांमागचं स्वप्न डोळ्यांसमोर दिसतं आहे… अजून खूप मजल मारायची आहे पण, one step at a time ! मृण्मयीचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे तिच्या या पोस्टवरून समजते.
View this post on Instagram
चाहत्यांनी मृण्मयीच्या या पोस्टवर भरभरून प्रेम दिल आहे. अनेकांनी कमेंटमध्ये तिला शुभेच्छा दिल्या आहेत. नाटकांमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली मृण्मयी कुंकू,अग्निहोत्र अशा मालिकांमधून घराघरात पोहचली. ‘नटसम्राट’ स्लॅमबूक अशा दमदार चित्रपटांमध्ये काम करून तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली आहे.