वाराणसी: राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. यातच राणे यांनी येत्या काळात आम्ही उत्तर देऊ म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राणेंना अटक झाल्यानंतर त्यांची त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. मात्र आज पासून पुन्हा आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग तसंच कणकवली शहरात राणेंचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसलीय. योद्धा पुन्हा मैदानात, अशा आशायचे बॅनर्स शहरभर लागले आहेत. या बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणेंचा फोटो आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री ठाकरेंवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने मंगळवारी राज्यात वादळी घडामोडी घडल्या. राणेंना जामीन मंजूर झाला झाला असला तरी हे प्रकरण अद्याप निवळलेलं नाही. येत्या काळात या जनआशीर्वाद यात्रेमध्ये शिवसेनेवर टीका करेल कि नाही आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.