वाघोली (पुणे) – येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण केली आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत वेळप्रसंगी स्व मालकीच्या जागादेखील या विकासकामांसाठी देऊ केल्या आहेत. त्यामुळे या वॉर्डातील विकास कामांचा आलेख सतत उंचावत ठेवत एक नवा विक्रम करून लोकप्रियता मिळवली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केले.
वाघोली (ता. हवेली) मधील वॉर्ड क्रमांक 1 मधील विविध विकासकामांचे उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वॉर्ड क्रमांक 1 मधील ओपन जीम इंडोस्कोटीश स्कुल, नगर रोड ते ग्रीन ग्रोव्हस सोसायटी तसेच वडजाईला जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचे उद्घाटन, गंगा अल्फा सोसायटी रस्त्याचे उद्घाटन समारंभ तसेच कल्पक होम्स सोसायटी ते बाईफ रोड ड्रेनेज लाईनचे 15 वर्षापासुन रखडलेला प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे तेथील नागरीकांनी आभार व्यक्त करण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे, ग्रामपंचायत सदस्या पुजा भाडळे, सर्व सोसायटीधारक व नागरिक यावेळी उपस्थित होते.