Stock market (मुंबई) – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदारांकडून शेअरची खरेदी चालूच आहे. त्यामुळे बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले. ( Stock market indices reach new highs )
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( Mumbai Stock Exchange Index ) सेन्सेक्स बुधवारी 0.80 टक्क्यांनी म्हणजे 393 अंकांनी वाढून 49,792 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 123 अंकांनी वाढून 14,644 या विक्रमी पातळीवर बंद झाला.
बरेच विश्लेषक भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक ( Indian Stock Exchange Index ) गरजेपेक्षा जास्त असल्याची शंका व्यक्त करीत असतानाही निर्देशांक वाढत असल्याबद्दल विश्लेषकांनी सांगितले की, एक तर चीनचा 2020 चा विकास दर 2 टक्क्याच्या जवळ गेला आहे. त्यामुळे इतर देशांचे विकास दरही वाढून जागतिक व्यापार वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते.
अमेरिकेच्या अर्थमंत्री नियुक्त जेनेट येलेन यांनी आगामी काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बरीच भांडवल सुलभता उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी किमान 1.9 लाख कोटी डॉलरचे अतिरिक्त पॅकेज उपलब्ध करण्याबाबत हालचाली सुरू केले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. त्यातील बरीच गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात येत असल्यामुळे निर्देशांकात वाढ होत आहे. काल परदेशी संस्थागत गुंतवणूदारांनी 257 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.
माहिती तंत्रज्ञान आणि ऊजा, वाहन क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची बुधवारी बरीच खरेदी झाली. टेक महिंद्रा, मारुती, एशियन पेंट्स, रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात दुसऱ्या दिवशी हे बरीच वाढ नोंदली गेली. मात्र पावर ग्रिड आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. आशियायी बाजाराबरोबरच अमेरिकन आणि युरोपियन शेअर बाजारातून सकारात्मक संदेश आले.