पुणे – एकाच दिवसाच तब्बल 1000 एल. आय. सी. पॉलीसी पुर्ण करण्याची कामगिरी विकास दिघे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर त्यांना कारकिर्दीतील पहिलेच आंतरराष्ट्रीय मानांकन ‘एमडीआरटी – युएसए’ मिळाले आहे. या दुहेरी कामगिरीमुळे दिघे यांना दुग्धशर्करा योग प्राप्त झाला.
मात्र दिघे यांनी सांगितले की, आपण केवळ एवढ्या यशावर समाधानी नाही. आगामी काळात आपण यापेक्षा मोठी कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या यशामध्ये दिघे यांना श्री बापुराव फड (सीएलआयए) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. फड यांनी दिघे यांचे कौतुक करतांना सांगितले की, दिघे यांनी कष्ट करून लोक संग्रह केला आहे. त्यामुळे त्यांना एवढे मोठे यश प्रप्त झाले आहे. दिघे आगामी काळात आणखी चमकदार कामगिरी करणार आहेत, याबद्धल मला खात्री आहे. त्यांच्या आगामी वाटचालीबद्धल आपण दिघे यांना शुभेच्छा देत असल्याचे त्यानी सांगितले.
दिघे यांनी ज्या एलआयसी शाखेच्या माध्यमातून ही कामगिरी केली आहे. त्या 952 शाखेच्या अधिकार्यानी दिघे याचे कौतूक करून शुभेच्छा दिल्या. त्यात वरिष्ठ मंडळ प्रबंधक आषुतोष कुमार, विपणन प्रबंधक सुयश तेलंग, विक्रय प्रबंधक संतोष पालकर, वरिष्ठ शाखा प्रबंधक मुकुंद भाईक, शाखा प्रबंधक (हिंजेवाडी एसओ) अभिमन्यु सिंग, सहायक शाखा प्रबंधक ( विक्रय) विनय कुलकर्णी यांचा समावेश आहे.