सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयकुमार लडकत

पुणे : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अकराव्या महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यातील लेखक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार लडकत यांची निवड झाली आहे.

लडकत हे पुण्यातील माळी आवाज संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी महात्मा फुले विचारदर्शन या पुस्तकाचेही संपादन केले आहे. या संमेलानाचे उद्‌घाटन राज्य ओबीसी सेवा संघाचे कार्याध्यक्ष नरेंद्र गद्रे यांच्या हस्ते होणार आहे.

अमरावती येथील वऱ्हाड विकास संस्था, संत गाडगेबाबा विद्यालय, व स्व. बापुरावजी देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोंजित करण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.