अभिनेत्री रश्मिका मंदान्नाची दक्षिणेतील तसेच हिंदीतील प्रेक्षकांमध्ये चांगली फॅन फॉलोइंग आहे. रश्मिका तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबाबतही चर्चेत असते. रश्मिकाचे चाहतेही तिच्या लव्ह लाईफबद्दल खूप उत्सुक आहे. गेल्या काही काळापासून रश्मिकाचे नाव विजय देवरकोंडासोबत जोडले जात आहे, परंतु दोघेही एकमेकांना फक्त चांगले मित्र म्हणतात. मात्र, यादरम्यान सोशल मीडिया एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रश्मीकाने एक इन्स्टा पोस्ट केली. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आणि एक फोटो आहे. फोटोमध्ये रश्मिका एका कॅफेमध्ये बसलेली दिसत आहे आणि व्हिडिओमध्ये ती जागा शोधताना दिसत आहे. रश्मिकाची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. या पोस्टवरून ती आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचे कनेक्शन दिसून येत आहे.
३0 मे रोजी विजय देवराकोंडा यांनी इंस्टावर काही फोटो शेअर केले होते, त्यापैकी एक या लोकेशनचा होता, जिथे रश्मिका दिसत आहे. रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ती तिच्या प्रवासाचे दिवस मिस करत आहे, म्हणजेच हा तिचा जुना फोटो आहे. अशात इन्स्टा वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये दोघेही एकत्र असल्याचे लिहिले आहे. हे फोटो तुर्कीचे आहेत, जिथे विजयने कुशी चित्रपटाचे शूटिंग करत होता ज्यामध्ये त्याच्यासोबत समंथा रुथ प्रभू होती.’ तर रश्मिकाने शेअर केलेले फोटो सुद्धा तुर्कीचे आहे. एकाच लोकेशन आणि ठिकाणचे दोघांचे फोटो असल्यामुळे चाहते आता या दोघांच्या पुन्हा एकदा डेटिंग फोटो म्हणून या पोस्टवर कंमेंट्स आहे.