पारनेर , (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम कला कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. पहिले तीनही क्रमांक पटकावत मुली अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत वैष्णवी दीपक घेगडे हिने ७४. १७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.
धनश्री संजय शेळके हिने ७० .३३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. मानसी जालिंदर बनकर हिने ७० .१७ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. श्रृती बनकर, साक्षी कोरके, आर्यन वाघमारे, रुपेश वाळुंज या खेळाडू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तर क्रीडा स्पर्धा सहभागाबद्दल प्रत्येकी १५ ग्रेस गुण मिळाले आहेत .
या विद्यार्थ्यांना कांता मांडगे , सोनाली शेळके , सतीश कौठाळे ,लक्ष्मण आयरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शाळा समिती अध्यक्ष चंदुलाल चोरडिया, प्राचार्य बाळासाहेब दहिफळे, पर्यवेक्षक विशाल डोके व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.