विधु विनोद चोप्राच्या बहुप्रतिक्षित “शिकारा’ शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. काश्मिरी पंडितांच्या व्यथांचे चित्रण यामध्ये आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून हुसकावून लावण्यात आले त्या अनुभवांना पडद्यावर मांडण्याचा हा पहिलाच प्रयत्न
असून, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक आणि समिक्षकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच दुसरीकडे मात्र, भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
नुकतंच या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी लालकृष्ण अडवाणीदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे हा चित्रपट पाहत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी काश्मिरी पंडितांसोबत जे झालं ते पाहून त्यांना अश्रु अनावर झाल्याचं सांगण्यात येत आहे. “लालकृष्ण अडवाणी यांनी शिकारा पाहिला. चित्रपटावर तुम्ही केलेलं प्रेम आणि दिलेले आशिर्वाद यासाठी मनापासून आभारी आहे”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं.
दरम्यान या चित्रपटात सिनेमाच्या लीड रोलमध्ये सादिया आणि आदिल खान ही एकदम नवीन फ्रेश जोडी पडद्यावर पदार्पण करणार आहे. काश्मीरमधून जवळपास 4 लाख काश्मिरी पंडीतांना आपल्याच देशात निर्वासित व्ह्यायला लागले होते. तीन दशकांनंतर ही व्यथा सिनेमाच्य स्वरुपात लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. काश्मिरी पंडीत असलेले एक जोडपे आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर बघते आहे.
बाहेर अन्य काश्मिरी पंडीतांची जळणारी घरे दिसत आहेत, असे या ट्रेलरमध्ये दिसते आहे. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य असेल. सिनेमाचे बहुतेक चित्रीकरण जम्मू काश्मीरमध्ये आणि प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यामध्येच झाले आहे. त्याला अलीकडच्या काळातील 370 कलम रद्द होण्याच्या वर्तमान स्थितीचाही ओझरता स्पर्श असण्याची शक्यता आहे.