मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या ख्रिसमसचा माहोल आहे. त्यामुळे अनेक स्टार्स पार्ट्यांसह ख्रिसमसचा आनंद घेताना दिसताहेत. अशात अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ हे व्हेकेशनवर गेल्याचे समजते. या दोघांचा एअरपोर्टवरून चेकइन करण्यासाठी जातानाचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
व्हिडिओमध्ये विकी आणि कतरीना घाई घाईत विमानतळावर दाखल होतात. विकी गेटवरील सुरक्षा रक्षकाशेजारी थांबतो तर कतरीना थेट आतमध्ये जाते. इतक्यात चेकिंगसाठी उभा असलेला जवान कतरिनाला आवाज देतो आणि पाठीमागे बोलावतो. त्यावर कतरिना पाठीमागे येताना दिसते,तर तिकीट तपासल्यानंतर सुरक्षा रक्षक दोघांनाही पुढे जाऊ देतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये विकीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेली आहे तर कतरीना नेहमीप्रमाणे लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसून येते. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर जोरदार कमेंटबाजी केली आहे. एका युजरने एव्हढी कसली घाई आहे ? असा सवाल विचहरला आहे. तर दुसऱ्याने भारतीय जवानांना सलाम अशी कमेंट केली आहे. अनेकांनी त्या कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षक जवानाचे कौतुक केले आहे.