मोरगाव – बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण, येथे शुक्रवारी (दि. 15) पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या ऑक्टोबर 2023 महिन्यातील कामगिरीमध्ये तुलनात्मकरित्या सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पोलीस स्टेशनचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बारमती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळ तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये वडगाव निंबाळकरचे सहायक निरीक्षक सचिन काळे यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या महिन्यात ड्रॅन्क अँड ड्राइव्हच्या केसेस, अवैध दारू व जुगार धंद्यांवर छापे, अमली पदार्थच्या कसेसची प्रभावी कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला.