मुंबई – ग्लॅमरस उर्वशी रौतेला तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सपासून तिच्या आउटफिट्सच्या किंमतीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची नजर असते. यावेळेस मात्र उर्वशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. नुकतेच उर्वशीच्या मानेवरील एका खुणेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री विमानतळावर स्पॉट झाली त्यावेळी तिच्या मानेवर एक खुण दिसून आली जेव्हा उर्वशीच्या चाहत्यांचे तिच्या मानेकडे लक्ष गेले तेव्हा त्यांना ही खुण लव्ह बाइट सारखी दिसून आली. त्यानंतर एका न्यूज पोर्टलने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर उर्वशी भलतीच चिडली. या वृत्तावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आणि न्यूज पोर्टलला फटकारले.
View this post on Instagram
या संदर्भात उर्वशीने ट्वीट केले त्यामध्ये तिने लिहिले की, ‘मजेदार!!! ही माझी लाल लिपस्टिक आहे जी माझ्या मास्कमधून पसरली आहे. लाल ओठ ठेवणे कठीण आहे, कोणत्याही मुलीला विचारा. ते काही लिहितात यावर विश्वास बसत नाही विशेषतः मुलींची प्रतिमा डागाळण्यासाठी. तुमच्या फायद्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याऐवजी तुम्ही माझ्या यशाबद्दल का लिहीत नाही. असे सवालही यावेळी उर्वशीने केला आहे.
उर्वशी ज्या व्हिडिओबद्दल बोलत आहे तो व्हॅलेंटाईन वीकचा आहे. अभिनेत्रीने विमानतळावरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिने सिक्विन रेड टॉपसह ब्लॅक स्कर्ट घातला होता. तिने काळे बूट आणि ब्लॅक शेड्स, पोनीटेलसह तिचा लूक पूर्ण केला.पोनीटेलमुळे उर्वशीच्या मानेवर झालेली खुण स्पष्टपणे दिसत होती. यावरून बराच गदारोळ झाला होता. मात्र, हा लव्ह बाइट नसून मास्कमुळे पसरलेली लाल लिपस्टिक असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले.