मुंबई : बॉलिवूडची हॉटेस्ट अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सध्या मलायका ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी ती छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते त्यामुळे आजही तिचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण यावेळी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
View this post on Instagram
मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका जीमवरून येत असल्याचे दिसते. मलायकाचा जीम लूक काही नेटकऱ्यांना आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे.
View this post on Instagram
मलायकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला,‘पैसे खर्च केल्यानंतर कोणतीही मुलगी सुंदर दिसते.’
दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मॅडमच्या वॉकला काय झालं काय माहित.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘नमस्ते काकू.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘कामवाली बाई’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे.