मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही जागा शिंदे गटाला सोडण्याची चर्चा सुरू होती. पण अखेर भाजपनेच तेथे आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते शिंदे गट आणि भाजप यांचे संयुक्त उमेदवार असतील. 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेचे रमेश लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच झाली होती, पण या निवडणुकीत मुरजी पटेल पराभूत झाले होते. रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही निवडणूक होत आहे.
यावेळी झालेल्या शक्तिप्रदर्शनात पटेल यांच्यासोबत भाजपचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार, पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार नितेश राणे उपस्थित होते. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर हेही उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काॅंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.
अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपात प्रवेश https://t.co/u08P2AtZ0K#Avdhoottatkare #bjp #shivsena
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंधेरी पूर्व निवडणुकीत सावध भूमिका घेतली. ठाकरे गटाच्या संदीप नाईक यांनी सुद्धा आज निवडणूक अर्ज भरला आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले की, हा नियम असतो, आयोगाचे नियम आहेत त्यानुसार शिवसेना ए आणि बी फाॅर्म भरत असते. पहिल्या उमेदवाराने काही कारणास्तव अर्ज मागे घेतला तर, दुसरा उमेदवार हा अधिकृत असतो, शिवसेनेने संदीप नाईक यांची उमेदवारी भरली आहे. पण ज्यावेळेला ऋतुजा लटके यांचा फाॅर्म कन्फर्म होईल तेंव्हा नाईक यांची उमेदवारी मागे घेतली जाईल. ऋतुजा लटके या बहुमताने विजयी होतील यात कोणतीही शंका नाही, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला आहे.
Himachal Pradesh Assembly Election: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; पाहा महत्वाच्या तारखा https://t.co/Dkw7yfxC9N
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022