पुणे – इंटेंसिटी टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन (१२ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आहान भट्टाचार्य, वेद परदेशी, विराज खानविलकर, आदिनाथ कचरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत आहान भट्टाचार्यने सहाव्या मानांकित मेघधीर बलराजचा ६-१, ६-३ असा तर, अकराव्या मानांकित वेद परदेशीने सातव्या मानांकित आवीर घुमरेचा टायब्रेकमध्ये ७-६ (८), ६-२ असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.
U12 Tennis Tournament : क्रिश, अनुप, बलराज यांचे सनसनाटी विजय…
नवव्या मानांकित आदिनाथ कचरेने गौतम त्रिपाठीचे आव्हान ६-१, ६-० असे मोडीत काढले. चौथ्या मानांकित विराज खानविलकरने आयुष वर्माचा ६-४, ६-३ असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. मुख्य ड्रॉमधील खेळाडूंची मानांकन यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुलांच्या गटात आरव बेले याला अग्रमानांकन देण्यात आले. मुलींच्या गटात वैदेही शुक्ला हिला अव्वल मानांकन देण्यात आले.