जैसलमेर – सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील सीमा भागात परवानगीशिवाय फिरणाऱ्या दोन संशयितांना पकडले. अटक केलेले दोन्ही संशयित रोजनी कॉलनीत विनापरवाना फिरत होते. गावकऱ्यांनी सीमा सुरक्षा दलाला माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले. १०८ बटालियनच्या जवानांनी दोन्ही संशयितांना पकडले आणि चौकशीनंतर त्यांना साम पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.
प्रतिबंधित क्षेत्रात पकडलेले दोन्ही नागरिक सीमाभागात येण्याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता दोघांनाही संयुक्त तपास समितीकडे सोपवण्यात येणार असून तेथे सर्व सुरक्षा यंत्रणा त्यांची कडक चौकशी करतील आणि प्रतिबंधित क्षेत्रात येण्याचे कारण शोधून काढतील, असे पोलिसांनी सांगितले.
१०८ बीएन बटालियन बीएसएफचे कंपनी कमांडर म्हणाले की, मंगळवारी संध्याकाळी उशिरा सीमा भागातील रोजनी गावाच्या कॉलनीत दोन संशयित व्यक्ती दिसल्या. बीएसएफच्या फील्ड टीमकडून माहिती मिळाल्यावर कंपनी कमांडर आपल्या पाच जवानांसह रोजनी वस्तीवर पोहोचला,
तिथे मोहम्मद रियाझ (४३) रा. जम्मू-काश्मीर, पूंछ जम्मू आणि मकसूद अहमद (४०, रा. पूंछ जम्मू जिल्ह्यात) हे दोघेजण होते.दोन्ही व्यक्ती सीमाभागातील गावात असल्याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता दोघांनाही संयुक्त तपास समितीकडे सोपवण्यात येणार आहे.