Tripti Dimri – अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर ‘अॅनिमल’ (Animal) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या दिवशीच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. ‘ॲनिमल’ (Animal) यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला असून, भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 312.96 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर इतक्यात चित्रपटानं 500 कोटींचा आकडा पार केला आहे.
या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिकाची केमिस्ट्री आणि रोमँटिक सीन लोकांना खूप आवडले. त्याचबरोबर अभिनेत्याचा तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोबतचा इंटिमेट सीनही चर्चेत आला आहे. यामध्ये तृप्ती रणबीरसोबत अतिशय बोल्ड सीन्स देऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, तृप्तीचे (Tripti Dimri) हे सीन्स सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत असून तिला अनेक लोक ट्रोल करत आहेत. अशात तृप्ती डिमरीनं यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
तृप्ती डिमरीनं (Tripti Dimri) नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या बोल्ड सीन्सवर प्रतिक्रिया दिलेली आहे. तृप्ती डिमरीनं सांगितलं की “सुरुवातीला तिला खूप वाईट वाटलं कारण तिच्या करिअरच्या सुरुवातीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तृप्ती डिमरीनं खुलासा केला की तिला आजवर 90 टक्के प्रेम मिळालं आहे आणि 10 टक्के ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, यावेळी तृप्ती ही आधीपासून तयार होती कारण तिला माहित होतं की तिला मिक्स रिअॅक्शन मिळणार आहेत. असं अभिनेत्री यावेळी म्हणाली.
तृप्ती डिमरीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री गेल्या 6 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने 2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे. अभिनेत्रीने नेटफ्लिक्सच्या ‘काला’, ‘बुलबुल’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.