मुंबई – तामिळ सुपरस्टार थलपथी विजयच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वरीसू’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘वरीसू’चा ट्रेलर आज म्हणजेच 4 जानेवारीला यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘वरीसू’च्या ट्रेलरला उदंड प्रतिसाद मिळत आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही विजय त्याच्या डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत आहे.
या चित्रपटात विजय सोबत प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्यभूमीकेत आहे. ट्रेलरमध्ये रश्मिका विजयसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. विजय आणि रश्मिकाची धमाकेदार केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना आणि विजय यांच्याशिवाय
या चित्रपटात प्रभू, सरथ कुमार, प्रकाश राज, जयसुधा, श्रीकांत, शाम, योगी बाबू, संगीता आणि संयुक्ता यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरला 1.1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून, फॅन्सला हा धमाकेदार चांगलाच आवडला आहे.