मुंढवा – राज्य सरकार मराठा आरक्षणाला विलंब करीत असल्याच्या निषेधार्थ सकल मुंढवा-केशवनगर मराठा समाजाच्या वतीने परिसरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते.
मशाल मोर्चाची सुरवात पिंगळे वस्ती येथील अखिल गणेशबाग गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आली. तेथून मार्चा मुंढवामार्गे लोणकरनगर चौकापर्यंत काढण्यात आला. केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली. “एक मराठा,लाख मराठा’, “जय जिजाऊ’, “जय संभाजी’, “जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चात प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले.
यामध्ये बापूसाहेब गायकवाड, अजित गायकवाड, नंदू पठारे, ऍड. राजशेखर गायकवाड, दिलीप व्यवहारे, विक्रम लोणकर, युवराज गायकवाड,अनिल लोणकर, राहूल शिंदे, धैर्यशील गायकवाड, अविनाश गायकवाड, नंदा जाधव, सुनीता घावटे, नंदू लोणकर, रणजित जामले, अमर देशमुख, दिनेश निकम, विशाल वाडेकर, नितीन वीर, संतोष माने, अण्णा इंगळे, रोहन पवार, रोहित शिंदे, सचिन गलांडे, किरण पवार, अमोल हंडेकरी, सूरज चव्हाण आदींसह मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.