मेष : आवश्यक वाटल्यास तडजोडीचे धोरण स्विकारा. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल तरी वाच्यता नको.
वृषभ : कामात चोख राहून कामे पूर्ण करा. कामात विरंगुळा म्हणून छोटीशी सहल काढाल. प्रवास घडेल.
मिथुन : घरात प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. डोके शांत ठेवावे.
कर्क : मोठया व्यक्तिंच्या वागण्याचा त्रास होईल. सहज सोप्या राहणाऱ्या कामात विलंब झाल्याने चिडचिड होईल.
सिंह : व्यवसायात वेळेचे गणित मागेपुढे होईल. अपेक्षित मदत मिळेलच असे नाही. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : नवीन कामे स्विकारताना त्यातील तांत्रिक अडचणींचा विचार करा. व्यवसायात सावध वृत्तीने वागा.
तूळ : नोकरीत दुर्लक्ष झालेल्या कामांची वरिष्ठांना गरज असेल. तातडीने कामे हाती घेऊन पूर्ण करावी लागतील.
वृश्चिक : चिंता वाटेल. सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीत सहकाऱ्यांवर कामे सोपवाल.
धनु : सभोवतालच्या व्यक्तींचे नवीन अनुभव येतील.फायद्यासाठी सलगी करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहा.
मकर : भावनेच्या भरात अयोग्य व्यक्तिशी संगत ठेवू नका. तेव्हा वेळोवेळी लक्ष ठेवणे चांगले राहील.
कुंभ : सर्वांच्या हितासाठी निर्णय घ्याल. त्यामुळे भविष्यात तुम्ही अडचणीत येणार नाही ना? याची दक्षता घ्या.
मीन : मित्रमंडळी नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. पैशाची चिंता मिटेल.