मेष : केलेल्या प्रयत्नांना यश मिळेलच. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य दया.
वृषभ : व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मिळणाऱ्या फायदयाचेही प्रमाण वाढेल. आर्थिक वाढ होईल.
मिथुन : भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे कामाची आखणी कराल. देणी देऊन डोक्यावरचे ओझे कमी करा.
कर्क : ग्रहांची मर्जी असल्याने तुमच्या सुप्त इच्छा आकांक्षा वाढतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने हायसे वाटेल.
सिंह : व्यवसायात पुढाकार घेऊन एखादी धाडसी कल्पना साकार करावीशी वाटेल. पैशाची चिंता दूर होईल.
कन्या : व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल.
तूळ : व्यवसायात जास्तीत जास्त चांगले काम करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न राहील.
वृश्चिक : व्यवसायात रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन काम ओळखीतून मिळतील. सहकारी कामांत यश मिळेल.
धनु : सकारात्मक दृष्टीकोना ठेवून वाटचाल करा यश मिळेल. पैशाची तरतूद करण्यासाठी बराच वेळ जाईल.
मकर : ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल त्याचा लाभ घ्या. व्यवहारात तुमच्या कामात अनुकूल घटना घडतील.
कुंभ : व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून घ्याल.
मीन : व्यवसायात साशंकता दूर झाल्याने महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन कामे ओळखीतून मिळतील.