नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत आज लागोपाठ चौथ्या दिवशी करोनाचे एक हजारापेक्षा अधिक रूग्ण आढळून आले आहेत. आज दिवभरात एकूण 1295 जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील करोनाग्रस्तांची संख्या आता 19 हजार 844 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे दिल्लीत तेरा जणांचा मृत्यू झाला असून शहरातील एकूण मृतांची संख्या आता 473 वर गेली आहे.