मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या आपल्या पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी देशाच्या विविध भागाचा दौरा करीत आहेत. दोन दिवस त्या मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या एका जाहीर कार्यक्रमाला उपस्थित असून या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
चित्रपटसृष्टीतील जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, रिचा चड्डा यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्डा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
या चर्चेत बोलतांना स्वरा भास्करनं म्हणाली, “हे सर्वजण चित्रपट सृष्टीमध्ये काम करतात. भारतात काय घडतंय, हे सांगताना या सगळ्यांना मोठा विरोध सहन करावा लागतोय. आपण एकत्रित येऊन भाजपा मुक्त भारत लवकरच घडवू.’