मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने टेलिव्हिजनपासून चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. शाहरुख खान सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
View this post on Instagram
त्यातच तो आता लवकरच डिजिटल डेब्यू करण्यास सज्ज झाल्याचे बोलले जात आहे. यातच किंग खानचा शाहरुखचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये शाहरुखने या कार्यक्रमात त्याला बॉलीवूड किंग खान बनविण्यासाठी तसेच करिअरमध्ये त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा उल्लेख करताना दिसत आहे.
तो व्हिडियो मध्ये सांगतो की,’माझ्या करिअरमध्ये सर्वाधिक मोठा वाटा हा महिलांचा आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यापासून महिलांचे विशेष स्थान आहे. यामध्ये माझी आई, बहीण, मुलगी किंवा माझी पत्नी बरोबरच… माझ्या सोबत काम करणाऱ्या अभिनेत्री सुद्धा आहेत.
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला.’चित्रपटामध्ये नेहमी श्रेय त्यातील हिरोला दिले जाते. मात्र ज्यातील ९० ते ९५ टक्के चित्रपटांचे श्रेय महिला अभिनेत्रींचे आहे. खरतर मी त्यांच्या नावाचे खातोय.” त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून शाहरुखचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडला आहे.