बीजिंग : माझे कोणतेही लैगिक शोषण झाले नव्हते. आपण गेल्या महिन्यात समाज माध्यमात केलेली पोस्ट गैरसमजुतीतून केली असल्याचे चीनी टेनिसपटू पेंग शुई हिने म्हटले आहे.
चीनचे माजी उपपंतप्रधान झंग गओली यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर जगभरातील टेनिस विश्वातून चिंता व्यक्त करण्यात येत होती.
माझे कोणाकडूनही लैंगिक शोषण झाले असे मी कोठेही म्हटले अथवा लिहले नाही, या सर्वात महत्त्वाच्या मुद्याकडे मी लक्ष वेधू इच्छिते. लिनहे झाओबाव या माध्यमात केलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये शुई ने हा खुलासा केला आहे.
हा व्हिडीओ खासगी बाब म्हणून ट्विटर सारखे समाज मध्यम असणाऱ्या झाओबाव ने काढून टाकला. आपण या पूर्वी केलेल्या पोस्टबाबत नागरिकांनी गैरसमज निर्माण करून घेतला. मी बीजिंगमधील घरात राहात असून माझ्यावर कोणीही पाळत ठेवत नाही. असेही तिने म्हटले आहे. मात्र त्यावर अधिक स्पष्टीकरण दिलेले नाही. शुई ने या आधी आरोप केलेला व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर रॉयटर या वृत्तसंस्थेने प्रयत्न करून ही तिच्याशी संपर्क झालेला नाही.