मुंबई – जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो. असं ट्विट करत अमृचा फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. त्या नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करत असतात.
Any man who must show ‘I am the King’ is no true King !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 25, 2021
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्षावर अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यामध्ये मंगळवारी राजकीय नाट्य रंगलं. राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
यानंतर दुपारी त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर करण्यात आला. या कारवाई प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला.