जयपुर – राजस्थानमधील कोटा या शहरामध्ये जगातील सर्वात मोठी आणि वजनदार घंटा तयार करण्यात येणार आहे. या घंटेचे वजन तब्बल 82 हजार किलो असणार असून या घंटेचा आवाज आठ किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू येणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या घंटेची नोंद केली जाणार आहे.
मुळात या घंटेचे वजन 57 हजार किलो ठरवण्यात आले होते पण त्यानंतर ही घंटा टिकाऊ होण्यासाठी त्यावर काही नक्षी आणि कलाकुसर करण्याचे ठरले त्यामुळे हे या नक्षी आणि कलाकुसरीच्या कामामुळे या घंटेचे वजन अजून 25 हजार किलोने वाढणार आहे. अशा प्रकारे ही घंटा एकूण 82 हजार किलोची ठरणार आहे सध्या चीनमध्ये 20 हजार किलो वजनाची घंटा आहे. ती घंटा तयार करत असताना काळजी घेण्यात न आल्याने त्या घंटेला तडे गेले असून ती मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारची वेळ या सर्वात मोठ्या घंटेवर येऊ नये यासाठीच या घंटेला नक्षीकाम आणि कलाकुसरीच्या माध्यमातून वेगळा आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे देवेंद्रकुमार आर्य या घंटेची निर्मिती करणार असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी या घटनेचे संकल्पचित्र फ्लेक्सच्या माध्यमातून कोटा शहरात प्रदर्शित केले या कामांमध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार विविध कलाकार हरिराम कुंभावत हे सुद्धा मदत करणार आहेत.
रशियाची राजधानी मॉस्को शहरांमध्ये अशा प्रकारची घंटा उभारण्यात आली असून त ती घंटा टिकाऊ ठरण्यासाठी त्या घंटेला ही नक्षीकामाने कलाकुसरीचा आधार देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कोटा शहरातील ही घंटा निर्माण करण्यात येणार आहे कोटा मधील चंबळ नदीच्या समोरच ही घंटा उभारण्यात येणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या घंटेला कोणत्याही प्रकारचा जोड असणार नाही एका सिंगल कास्टिंगमध्येच ही घंटा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ती जास्त टिकावू ठरेल असा निर्मात्यांचा दावा आहे.