पुणे – पुणे (लोहगाव) आंतराष्ट्रीय विमानतळावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या 46 हजार 450 चौरस मीटर टर्मिनलचे काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल सुरू झाल्यानंतर लोहगाव विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता वाढणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे विमानतळाचे सध्या टर्मिनल 22 हजार 300 चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. यात नवीन टर्मिनलच्या कामासाठी 475 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. 51 हजार 595 चौरस मीटर क्षेत्रावर हे टर्मिनल विस्तारले आहे. वर्षाला सव्वाकोटी प्रवासी
क्षमता असेल. दोन्ही टर्मिनल जोडल्यानंतर नागरी वाहतुकीसाठी 73 हजार 895 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे.
दोन्ही मिळून ही प्रवासी क्षमता ही 1 कोटी 91 लाख होणार आहे. त्यामुळे विमानतळावर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपर्यंत ते नागरी वाहतुकीसाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे.
लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनलचे काम जलद गतीने सुरू आहे. जूनअखेर राहिलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध असून नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी चांगल्या सुविधा मिळणार आहे.
– संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ