अजय देवगणची आगामी वेबसीरिज रूद्रचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये अॅक्शनचा तडका असणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून अजय ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये अजय मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत अजय देवगण रुद्रवीर सिंग उर्फ रुद्रची भूमिका साकारताना दिसणार असून तो एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये अभिनेत्री राशी खन्ना अजय देवगणसोबत माइंड गेम्स खेळताना दिसत आहे. तसेच, अजय एका गुन्हेगाराच्या शोधात आहे. या गुन्हेगाराच्या शोधात अजयला अनेक गोष्टी पाहायला मिळत असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणीही वाढत आहेत.
ही वेब सीरिज 4 मार्चला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ईशा देओल, राशी खन्ना, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, मिलिंद गुणाजी आणि ल्यूक केनीदेखील या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंटने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.