नगर, (प्रतिनिधी) – प्रिमियम चिक फिडस् कंपनीचे शाहुनगर, केडगाव येथील कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडले. १२ हजार ८३३ रूपयांची रोकड व १५ हजाराची डिजीटल तिजोरी असा २७ हजार ८३३ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सदरची घटना शुक्रवारी (दि. १) सायंकाळी साडेसात ते शनिवारी (दि. २) सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी प्रशांत दत्तात्रय जमदाडे (वय ३१ हल्ली रा. बुर्हानगर, नगर, मुळ रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिमियम चिक फिडस् या कंपनीचे शाहुनगरमधील बँक कॉलनीत कार्यालय आहे. ते कार्यालय फिर्यादी यांनी शुक्रवारी सायंकाळी बंद केले होते.
त्यानंतर चोरट्यांनी कार्यालयाचा कडीकोयंडा, कुलूप तोडून आत प्रवेश केला. रोकड, तिजोरी चोरून नेली. दुसर्या दिवशी शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार राहुल शिंदे अधिक तपास करीत आहेत.