नायपितॉ (म्यानमार) – म्यानमारच्या पदच्युत नेत्या आंग सान स्यू की यांच्याविरोधात लष्करी प्रशासनाने दाखल केलेल्या खटल्याला आजपासून सुरूवात झाली. स्यू की यांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या लष्करी शासनावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका झाली आहे.
आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर केल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयागानेही टीका केली होती. मात्र म्यानमारच्या संसदेने हे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत.
म्यानमारच्या लष्कराने 1 फेब्रुवारी रोजी बंड करून स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त केले दोला आणि सरकारमधील बहुतेक सर्व प्रमुख नेत्यांना अटक करून ताब्यात घेतले होते.
स्यू की यांच्यावर राष्ट्रीय गोपनीयतेच्या कायद्याचा भंग करणे, साथरोग कायद्याचा भंग करणे, यान्गोनच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून 6 लाख डॉलर आणि 11 किलो सोने स्वीकारण्याचा भ्रष्टाचाराचा आरोपही ठेवला आहे. स्यू की यांच्या पक्षाने निवडणूकीत गैरप्रकार करून सत्ता मिळवल्याचाही आरोप लष्कराने केला होता. मात्र स्यू की यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
लष्कराच्या बंडाविरोधात देशभर झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 862 जण ठार झाले आहेत.