मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेत सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. त्यादरम्यान त्यांचा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती अदाने ट्वीटद्वारे दिली आहे.
I’m fine guys . Getting a lot of messages because of the news circulating about our accident. The whole team ,all of us are fine, nothing serious , nothing major but thank you for the concern ❤️❤️
— Adah Sharma (@adah_sharma) May 14, 2023
अदाने ट्वीट करत लिहिले की, “मित्रांनो, मी ठीक आहे. आमच्या अपघाताबद्दल अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.” मात्र हा अपघात नेमका कसा घडला? हे अद्याप समजू शकलेले नाही.
‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी देखील ट्वीट करत अपघाताबद्दल माहिती देत लिहिले की, “आज आम्ही करीमनगरातील एका मेळाव्यात आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात होतो. पण, दुर्दैवाने आमचा अपघात झाला आणि आम्हाला पुढचा प्रवास करता आला नाही.आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही सिनेमा बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत राहा.” याशिवाय त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहचता न आल्याने करीमनगरच्या जनतेची माफीही मागितली.
Today we’re supposed to visit Karimnagar to talk about our film at a youth gathering. Unfortunately we could not travel due some emergency health issue. Heartfelt apology to the people of Karimnagar. We made the film to save our daughters. Pls keep supporting us #HinduEkthaYatra pic.twitter.com/LUr2UtQWfj
— Sudipto SEN (@sudiptoSENtlm) May 14, 2023
दरम्यान, सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच जगभरात शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे.