चेन्नई – तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केली. प्रतीक्षा नावाच्या मुलीने तिच्या पालकांनी तिला अभ्यास करायला लावला म्हणून टोकाचं पाउल उचलले आहे. या नऊ वर्षांच्या मुलीला तिचे शेजारी ‘इन्स्टा क्वीन’ असे.
मिळालेल्या, प्रतीक्षाचे वडील कृष्णमूर्ती यांनी तिला सासरच्या घराजवळ खेळताना पाहून घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगून घराच्या चाव्या दिल्या. यानंतर ते दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले असता, रात्री 8.15 वाजेच्या सुमारास ते घरी परतले त्यावेळी त्यांना घराला आतून कुलूप असल्याचे दिसले. हे पाहून त्यांनी मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले. प्रतीक्षाने प्रतिसाद न दिल्याने कृष्णमूर्ती घाबरले आणि मागची खिडकी तोडून आत गेले. त्यावेळी त्यांना मुलीच्या गळ्याला टॉवेल लटकलेला दिसला. ते ओरडू लागले. कृष्णमूर्ती यांनी तातडीने लेकीला शासकीय रुग्णालयात नेले, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका 10 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली.