Municipal Corporation Election | राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानुसार राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जळपास पूर्ण झाली असून, येत्या २४ तासांमध्ये महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात आज सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यास आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील महापालिका निवडणुका या एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे नागपूर आणि चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील, असा म्हटले जात होते, पण आता सर्व महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याचे समोर आले आहे. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. तर, मतमोजणी १७ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Municipal Corporation Election | जिल्हा परिषद निवडणुका कधी? महापालिका निवडणुका झाल्यानंतर राज्यात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेली. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावरील सुनावणीनंतरच निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे. Municipal Corporation Election | दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली असल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. Municipal Corporation Election | हेही वाचा: ‘छडी लागे छमछम’ बंद ! विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा दिल्यास होणार थेट कारवाई