State Election Commission : २ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, २० डिसेंबरला २४ नगरपरिषदांसाठी मतदान होऊन या निवडणुकांचा एकत्रित निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी निर्णयावर राज्य निवडणूक आयोगाला लक्ष केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र, जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादांचे उल्लंघन झाल्याने त्या अगोदर राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जावू शकतो, अशी माहिती आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते. यासंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या आयुक्तांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महापालिका निवडणुकांचा आढावा घेतला जाणार आहे. सर्वेाच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयागोला न्यायालयाने आखून दिलेल्या वेळेत निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. पण या निवडणुका पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आयोगासमोर असणार आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. तर महापालिकांमध्ये चंद्रपूर आणि नागपूर महापालिकेत आरक्षण मर्यादाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यानुसार आता हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आली असून, या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी नेमकं काय होते आणि आयोग काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Kalki 2898 AD Sequel: ‘कल्की 2’ मध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा? मेकर्सच्या शांततेमुळे चर्चांना उधाण