नाशिक :- देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने आपल्या राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नाशिक येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२३’ च्या अनावरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कोणत्याही राज्याची आर्थिक परिस्थिती ही त्या राज्यातील औद्योगिक विकास व रोजगार यावर अवलंबून असते. जे उद्योग उभे राहणार आहेत. त्यांना सवलती देवून आवश्यक अनुषंगिक परवानग्या दिल्या, तर नक्कीच ते भरभराटीला येतील यात शंका नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.