व्यायामाच्या कपड्यांना पसंती
सकाळी व्यायामाच्या वेळी वापरले जाणारे ट्रॅकसुटसारख्या नाईट पॅन्टस ,जॅकेटस आदी प्रकारच्या कपड्यांना जास्त मागणी असून पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या मुला-मुलींमध्ये अश्या प्रकारच्या कपड्यांची मोठी क्रेझ आहे.व्यायामाच्या वेळी अश्या कपड्यात स्त्री -पुरूषांना सुरक्षित आणि आरामदायक वाटते.
नगर – पावसाळा उशिरा संपला. हवेत गारवा वाढु लागल्याने गुलाबी थंडी पडायला सुरवात झाली आहे.सकाळी फिरायला जातांना गरम कपडे मफलर कान टोपी वापरतांना नागरीक दिसू लागले आहेत तर महिलाही फिरायला जातांना स्वेटर्स आणि स्कार्फ वगैरे गरम कपडे वापरू लागले आहेत.थंडीला सुरवात होवू लागल्याने गरम कपड्यांच्या दुकानेही थाटली जात आहेत.नागरीकांचेही पाय या दुकानांकडे वळू लागले आहेत.
यंदा गरम कपड्यांच्या बऱ्याच प्रकारचे कपडे बाजारात उपलब्ध आहेत. टु इन वन याप्रकारचे जॅकेट.स्वेटर्स ,बीन बाह्यांचे स्वेटर्स ,महिलांसाठी लोकरी कोट लहानमुलांसाठीचे जॉकेटस आदी प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे मफलर ,टोप्या ,कान टोप्या कान पट्ट्या ही उपलब्ध आहेत.आणि रस्त्यावर थाटलेल्या दुुकानात दरात घासाघीस करता येत असल्याने ग्राहकांची या दुकानातून गर्दी जास्त दिसते. नगर पुणे रस्ता ,जिल्हाधिकारी कार्यालय,नव्या तहसिलदार कचेरी जवऴ अशी दुकाने थाटली आहेत.
मोठ्या माणसांचे टु इन वन जॅकेटची किंमत 500 ते 1000रुपयांपर्यंत असून महिलांचे कोट 400 ते 500 रुपयांपर्यंत तर लोकरी स्वेटर्स 250 ते 350 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत त्याच बरोबर कहान मुलांचे जॅकेटस आणि स्वेटर्स ही 250 ते 500 रुपयांपर्यंत उपलभ्ध आहेत. यंदाची थंडी सुसह्य होण्यासाठी केटसुल ,आणि त्याला नेटेडचे खिसे असलेल्या नाईट पॅन्ट्स आणि नेटेडचे आस्तर असलेले टी शर्टस देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
थंडी पासून बचाव करण्यासाठी माकड टोपी आणि कान टोपीलाच लोकांची जास्त पसंती असते त्याचबरोबर लोकरीच्या हातमोज़्यांनाही मोठी मागणी असते तर महिलाही स्वेटर्स बरोबर स्कार्फ ची मागनी करतांना दिसतात .मात्र तरूणाई मध्ये टु इन वन च्या जॅकेटसना आणि कॉटसुल आणि जाड्या भरड्या कापडांच्या नाईट पॅंन्टसना मागणी वाढतांना दिसतेय.