अभिनेत्री मौनी रॉयने “मेड इन चायना’ मध्ये राजकुमार रावबरोबर काम केले आणि तिला त्याच्याबरोबर काम करण्याचा खूप अनुभवही मिळाला. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, असे मौनी रॉय म्हणते. आपल्याला अधिक सरस अभिनय करण्यासाठी राजकुमार रावनेच शिकवले. या चित्रपटातील आणि आपल्या कामासाठी मी राजकुमार रावकडून बऱ्याच गोष्टी शिकले, असे मौनी म्हणते. अभिनयाच्या सरावादरम्यान त्याने मला माझी भूमिका नीट समजावून सांगितली.
तो नेहमीच माझी मदत करतो, केवळ दृश्यासाठी असलेल्या काही गोष्टीच नव्हे तर माझ्या स्वत:च्या दृश्यांमध्ये देखील माझी मदत करतो, असे मौनी म्हणाली. त्याच्याबरोबरच्या सीन्समध्ये तो मला मदत करणारच ही मला त्याच्याविषयीची खात्री आहे. त्यांच्या सहकार्याची किंमत खूप जास्त आहे आणि ते माझ्या मदतीसाठीच आहे, असेही मौनी म्हणाली.
मिखिल मुसालेनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा एका अपयशी व्यवसायिकाच्या संघर्षाच्या आसपास फिरत राहते. या सिनेमामध्ये मौनीने राजकुमार रावच्या पत्नीचा रोल केला आहे. राजकुमारच्या सहकार्यामुळेच आपण चांगले काम करू शकल्याबद्दल तिने राजकुमारचे मनापासून आभार मानले आहेत.