बंगळुरू – दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाचीच पुनरावृत्ती कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यात घडली आहे. इथे फरक एवढाच आहे की येथे मुलानेच आपल्या पित्याची हत्या करून त्याच्या शरिराचे तब्बल 33 तुकडे करून ते एका बोअरवेलमध्ये फेकले होते. दोन्ही घटनांमधील व्यक्ती जरी भिन्न असल्या तरी त्यातील क्रूरता आणि मानवात असलेले पशुत्व यांच्यात साम्य आहे.
विठला कुलाली असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 6 डिसेंबर रोजी त्याने रागाच्या भरात त्याचा पिता परशुराम कुलाली याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुरामला दारूचे व्यसन होते व त्यामुळे तो मुलाला रोज शिविगाळ करायचा. त्याची पत्नी आणि मोठा मुलगा वेगळे राहत होते.