Team India Squad : टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारताचा संघ जाहीर! गिल-जितेशच्या जागी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Team India Squad Announce for T20 World Cup 2026 : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या मोहिमेसाठी बीसीसीआयने आपला प्राथमिक संघ जाहीर केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवल्या जाणाऱ्या या मेगा इव्हेंटची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. २०२४ च्या विश्वविजेत्या संघाचा अविभाज्य भाग असलेला धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडे या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादवला मिळाली मोठी जबाबदारी –
रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. २०२४ मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले होते, आता ते जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान सूर्यासमोर असेल. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाला टी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही; त्यामुळे भारताकडे मायदेशात इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
या दोन खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता –
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced 🚨
Let’s cheer for the defending champions 💪#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk
— BCCI (@BCCI) December 20, 2025
बीसीसीआयने जाहीर केलेल्या टी-२० संघातून शुबमन गिल आणि जितेश शर्माला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या दोघांच्या जागी रिंकू सिंग आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. शुबमन गिल बऱ्याच कालावधीपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे त्याला टी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर इशान किशनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळाले.
हेही वाचा – IND vs SA : भारताचा आफ्रिकेवर ‘विराट’ विजय! मालिका ३-१ ने खिशात; हार्दिक-तिलकसह वरुण ठरला विजयाचा शिल्पकार
भारत-पाकिस्तान महामुकाबला १५ फेब्रुवारीला –
भारतीय संघाचा समावेश ‘ग्रुप-ए’ मध्ये करण्यात आला असून, त्यात पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामीबिया या संघांचा समावेश आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ २०२६ मध्ये पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.
- पहिला सामना: ७ फेब्रुवारी (विरुद्ध अमेरिका)
- दुसरा सामना: १२ फेब्रुवारी (विरुद्ध नामीबिया)
- हाय-व्होल्टेज सामना: १५ फेब्रुवारी (विरुद्ध पाकिस्तान)
- अखेरचा साखळी सामना: १८ फेब्रुवारी (विरुद्ध नेदरलँड्स)
हेही वाचा – IND vs SA : हार्दिकचं विक्रमी अर्धशतक अन् गर्लफ्रेंड माहिकाला फ्लाईंग किस, VIDEO होतोय व्हायरल
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन.





