IND vs SA : रोहित शर्माने रचला इतिहास! वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच खेळाडू

शाहिद आफ्रिदीचा 10 वर्षांचा विक्रम मोडला –
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा अनेक वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशाह होता. त्याने 398 सामन्यांमध्ये एकूण 351 षटकार मारले होते आणि हा विक्रम जवळपास दहा वर्षांपासून अबाधित होता. मात्र, रोहित शर्माने (277 वनडे सामने, 269 इनिंग्स) आपल्या 352 व्या षटकारासह हा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितची ही आक्रमकता आणि धावांची भूक त्याच्या या विक्रमामागील सर्वात मोठी कारणे ठरली आहेत.
🚨 Record Alert 🚨
Rohit Sharma now holds the record for most sixes in ODI cricket history! 🙌
TAKE. A. BOW 🙇♂️
Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/apcmS1UACG
— BCCI (@BCCI) November 30, 2025
वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
| फलंदाज | संघ | एकूण षटकार |
| रोहित शर्मा | भारत | 352* |
| शाहिद आफ्रिदी | पाकिस्तान | 351 |
| ख्रिस गेल | वेस्ट इंडिज | 331 |
| सनथ जयसूर्या | श्रीलंका | 270 |
| एम.एस. धोनी | भारत | 229 |
हेही वाचा – IND vs SA : दव अन् फिरकीचा खेळ! रांचीमध्ये टॉस ठरेल गेम चेंजर, विराट-रोहितवर सर्वांच्या नजरा
विराट-रोहितची शानदार भागीदारी –
रांचीच्या मैदानावर भारताची सुरुवात खराब झाली होती, पण त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मिळून भारताचा डाव यशस्वीपणे सांभाळला. या दोन्ही दिग्गजांनी विरोधी गोलंदाजांवर दबाव टाकत वेगाने धावा जमवल्या. विराट कोहलीने 48 चेंडूंमध्ये आपले 76 वे वनडे अर्धशतक पूर्ण केले, तर रोहित शर्माने केवळ 43 चेंडूंमध्ये आपले 60 वे वनडे अर्धशतक साजरे केले.
रोहितने या खेळीदरम्यान आपले आवडते चौकार आणि षटकार मारणे सुरूच ठेवले. 352 षटकारांसह, त्याने केवळ वैयक्तिक विक्रमच नाही, तर एका संघासाठी सर्वाधिक वनडे षटकार मारण्याचा (352 – भारत) विक्रमही भारताच्या नावे केला आहे, जो आधी शाहिद आफ्रिदीच्या (349 – पाकिस्तान) नावावर होता.
हेही वाचा – IND vs SA : विराट कोहलीला रांचीत इतिहास रचण्याची संधी! फक्त ‘इतक्या’ धावा आहे दूर
रोहित शर्माने आता वनडे क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात केली आहे आणि जर तो याच आक्रमक अंदाजात खेळत राहिला, तर येत्या काळात आणखी मोठे विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतात यात शंका नाही.





